‘न्यूड’ चित्रपटाला लागलेले ग्रहण अखेर संपले

1

सामना ऑनलाईन । मुंबई

रवी जाधव दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘न्यूड’ ला लागलेले ग्रहण अखेर सुटले आहे. ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून कोणतीही कात्री न चालवता ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ‘न्यूड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असल्याने दिग्दर्शक रवी जाधवने फेसबुक पोस्ट करीत सेन्सॉर बोर्डाचे मनापासून आभार मानले आहेत. त्याशिवाय अभिनेत्री विद्या बालन यांच्या अध्यक्षतेखालील सीबीएफसीच्य्या विशेष ज्युरी मंडळाने आम्हाला विशेष सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! असे रवी जाधव यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.

‘न्यूड’चा टीझर रिलीज, प्रेक्षकांच्या उड्या

सेन्सॉर बोर्डाकडून दिलेल्या प्रमाणपत्रांचे अर्थ जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी गोव्यात पार पडलेल्या ४८ व्या इफ्फी महोत्सवातून ‘न्यूड’ चित्रपटाला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रपटसृष्टी एकवटली होती. या चित्रपटाचे कथानक मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलांवर आधारित असणार आहे. प्रचंड वाद होत असताना रवी जाधव यांनी या चित्रपटाचा टीझर लाँच केला होता. विशेष म्हणजे हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. अगदी वेगळ्या धाटणीचा ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट कधी प्रदर्शित होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.