विश्वचषकापूर्वी रवी शास्त्रींनी घेतले साईबाबांचे दर्शन

64

सामना ऑनलाईन । शिर्डी

टीम इंडिया मंगळवारी वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाली. त्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्डीत जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत फिल्डिंग कोच आर. श्रीधरही होते. आर. श्रीधर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर साईबाबा मंदिर दर्शन आणि विमानाचे फोटो अपलोड केले आहेत. रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांच्या खासगी विमानाने रवी शास्त्री आणि श्रीधर यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. हे फोटो अपलोड करतानाच श्रीधर यांनी सिंघानिया यांचे आभारही मानले.

आपली प्रतिक्रिया द्या