दक्षिण आफ्रिकेत रवी शास्त्री नव्या भूमिकेत!

सामना ऑनलाईन । मुंबई

‘हॅपी न्यू इअर’ म्हणत रविवारी शुभेच्छांचा वर्षाव करत नववर्षाचे जल्लोषपूर्ण स्वागत झाले. हिंदुस्थानी क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी नववर्षाचं सेलिब्रशन दक्षिण आफ्रिकेत केलं. हिंदुस्थानी संघाच्या नववर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचा एक फोटो चांगलाचा चर्चेत आहे. या फोटोमध्ये रवी शास्त्री ‘डीजे’च्या भूमिकेत दिसत आहेत. दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील हा फोटो आहे.

रवी शास्त्रींच्या या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. यामध्ये शास्त्रींना काहींनी ‘डीजे वाले बाबू’ म्हटलंय तर काहींनी ‘डीजेवाले बाबू मेरा गाना बजा दो’ अशी कमेंट केली आहे. दक्षिण अफ्रिकेत हिंदुस्थान तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात ५ जानेवारीपासून होणार आहे.