जम्मू कश्मीरच्या प्रदेशाध्यक्षांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आल्यानंतर लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला वेग आला आहे. याअंतर्गत ४८ तासात ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून फुटीरतावादी नेत्यांची धरपकडही सुरू झाली आहे. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, दहशतवादावर आपण कायम बोलत असतो. यामुळे याआधीही पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अशा धमक्या देण्यात आल्याचे रैना यांनी म्हटले आहे. रैना यांनी यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना विधानसभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतरही त्यांना पाकिस्तानमधून धमकीचा फोन आला होता.