सेनगावकर मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने शुक्रवारी पोलीस दलात अनेक बदल केले. रवींद्र सेनगावकर हे आता मुंबई रेल्वेचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. नक्षलग्रस्त भागात काम केलेल्या अंकुश शिंदे यांना सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. निकेत कौशिक यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, मुंबई गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त असलेले दिलीप सावंत यांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी आणि पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांना ठाणे येथे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली.

शुक्रवारी गृह विभागाने आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश काढले. 7 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांना पोलीस उप महानिरीक्षक /अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आल्या. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे हे आता मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे सह पोलीस आयुक्त असणार आहेत. कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज हे आता मुंबई पोलिसांच्या सह पोलीस आयुक्त (प्रशासन) पदी असणार आहेत. नक्षलग्रस्त भागात काम केलेल्या अंकुश शिंदे यांना सोलापूर पोलीस आयुत्तपदी बढती देण्यात आली. मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश प्रधान यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापनापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सुरेश मेखला याना सह पोलीस आयुक्त ठाणे पदी बढती देण्यात आली.

डॉ. रवींद्र शिसवे यांची सह पोलीस आयुक्त पुणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र पदी बढती देण्यात आली आहे. तर राजकुमार व्हटकर हे आता नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त असणार आहेत.

n मुंबईच्या परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांना अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) ठाणे शहर, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची अप्पर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा, सोलापूरचे पोलीस उपायुक्त एस. महावरकर यांची अप्पर पोलीस आयुक्त नागपूर शहर, मुंबईच्या एल ए 4 चे पोलीस उपायुक्त संजय येनपुरे यांची अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) ठाणे शहर, परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी याना पोलीस उप महा निरीक्षक ( राज्य राखीव पोलीस बल, पुणे), राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांची अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड, सत्यनारायण, ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम) याना पोलीस उप महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, सोलापूर चे पोलीस आयुक्त महादेव तांबडे याना पोलीस उप महानिरीक्षक (गडचिरोली), श्रीकांत तरवडे यांची अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या