बँक शनिवारीही सुरू राहणार, रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा

5

सामना ऑनलाईन । मुंबई

आता शनिवारीही बँक बंद असणार असा मेसेज व्हॉट्सऍपवर फिरत होता. तसेच काही माध्यमांनीही असे वृत्त दाखवले होते. परंतु रिझर्व्ह बँकेने हे वृत्त फेटाळले असून आठवड्याचे सहा दिवस बँक सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

एक जून पासून बँक शनिवार आणि रविवार बंद असणार आहे. म्हणजेच पाच दिवसांचा कार्यकालीन आठवडा असणार आहे. अशा आशयाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. रिझर्व्ह बँकेचे मुख्य प्रबंधक योगेश दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने असे कुठलेच पत्रक काढलेले नाही, तसेच बँका शनिवारीही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.