सेटमॅक्सवर सूर्यवंशम सतत का दाखवतात, हे आहे कारण

392

सामना ऑनलाईन । मुंबई 

सूर्यवंशम हा चित्रपट गेल्या अनेक वर्षांपासून दर आठवड्याला  सेट मॅक्स वाहिनीवर दाखवला जातोच. त्यामुळे सेट मॅक्स वाहिनी आणि सूर्यवंशम चित्रपट हे एक समीकरणच बनलं आहे. हा चित्रपट लागला नाही तर प्रेक्षकांना देखील चुकल्यासारखे वाटते.

sooryavansham-1

– 21 मे 1999 रोजी  प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाली असली तरी सेट मॅक्सवर दर आठवड्याला दाखवला जात असल्यामुळे या चित्रपटाची आजही चांगलीच चर्चा होत असते. 

sooryavansham-2

हा सिनेमा या वाहिनीवर वारंवार दाखवला जातो. याचे कारण म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही वेळ आधीच ही वाहिनी लाँच झाली होती. त्यावेळी या वाहिनीने एक, दोन नव्हे तर तब्बल 100 वर्षांसाठी या सिनेमाचे राइट्स विकत घेतले होते. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने येथे पाहायला मिळतो.

sooryavansham-6

सूर्यवंशम या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. सुरूवातीला या सिनेमात पित्या व मुलाच्या भूमिकेसाठी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना विचारण्यात आले होते.

sooryavansham-5

कन्नड अभिनेत्री सौंदर्या हिचा सूर्यवंशम हा पहिला आणि शेवटचा बॉलीवूड चित्रपट होता. 17 एप्रिल 2004 रोजी हेलिकॉप्टर अपघातात तिचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या