अकाली केस पांढरे का होतात? वाचा

224

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

ठराविक वयानंतर केस पांढरे होणे हा निसर्गाचा नियम आहे. पण हल्ली लहानांपासून तरुणांपर्यंत कोणाचेही केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत. कमी वयात लहान मुलांचे केस पांढरे होणे हे आनुवंशिक जरी असले तरी अकाली केस पांढरे होण्यामागे दुसरीही कारणे आहेत.

grey-2

प्रदूषण- हवेतील प्रदूषण हे देखील अकाली केस पांढरे होण्यामागचे एक कारण आहे. हवेतील प्रदूषित घटकांमुळे केस खराब होतात. त्याचा पोत बिघडतो. केस पांढरे होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते हवेतील सूक्ष्म धूलीकणांमुळे केस लवकर पांढरे होतात.

grey-3

तणाव- अकाली केस पांढरे होण्यामागे तणाव हे देखील एक कारण आहे. तणाव घेतल्याने केसांचा नैसर्गिक रंग फिका पडतो. यामुळे अकाली केस पांढरे होणे टाळायचे असेल तर तणाव विरहीत राहणे महत्वाचे.

smoking-grey

धूम्रपान- धूम्रपानामुळेही केस लवकर पांढरे होतात. 2013 साली केले गेलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांचे केस अकाली पांढरे होण्याची शक्यता सामान्य व्यक्तीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक असते. तसेच धूम्रपान आरोग्यासही घातक असते.

grey-hair

हार्मोन- शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडला तरी केस पांढरे व कोरडे होतात. केसांची चमक कमी होते.ते निस्तेज दिसू लागतात. तसेच केस गळण्याची समस्याही सुरू होते.

grey-food

निकृष्ट दर्जाचा आहार- आपल्या आहाराचा थेट परिणाम शरीरावर होतो. यामुळे आहाराच्या बाबतीत शिस्त पाळणे गरजेचे आहे. जर तुमच्या आहारात आवश्यक घटक कमी असतील तरीही तुमचे केस पिकू लागतात. शरीरात व्हिटामिन-बी ची कमतरता असेल तरीही केस कोरडे, निस्तेज व पांढऱे होतात.

आपली प्रतिक्रिया द्या