डाळींब पुलाव

साहित्य – बासमती तांदूळ, मटार, फ्लॉवर, गाजर, डाळींबाचे दाने, बारिक चिरलेला कांदा, मीठ, साखर, तूप, काजू, बदाम, मनुका, दालचिनी, लवंग, काळिमीरी, तमालपत्र, शाही जीरं

कृती – बासमती तांदूळ धुवून घ्यावेत. मोठ्या टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळल्यावर दालचिनी, लवंग, काळिमीरी, तमालपत्र, शाही जीरं टाका. मीठ टाकून त्यात तांदूळ टाका. बासमती तांदूळ व्यवस्थित शिजला की त्यातलं पाणी काढून टाकून भात नितळत ठेवा. फ्लॉवर व गाजर छोट्या आकारात कापून घ्या. मटार, फ्लॉवर, गाजर व्यवस्थित वेगळे शिजवून घ्या. एका मोठ्या कढईत तूप गरम करा. तूप गरम झालं की त्यात काजू, बदाम, मनुका तळून घ्या व बाजूला ठेवा. नंतर तुपात शाही जीरं व तमालपत्रं टाका. चांगलं परतलं की बारिक चिरलेला कांदा टाका. कांद्यावर थोडे मीठ आणि चमचाभर साखर टाका. कांदा लालसर झाला की त्यात शिजवलेल्या भाज्या, भात, तळलेले काजू, बदाम, मनुका आणि डाळींबाचे दाणे टाका. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. गरमा गरम डाळींब पुलाव तयार आहे.