कढाई आलू

साहित्य- ४ बटाटे मध्यम आकाराचे, २ सिमला मिरच्या, अर्धी वाटी तूप, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ मध्यम आकाराचा कांदा सालासकट गॅस वर भाजून घ्यावा, भाजलेला कांदा, ६ काजूची मिक्सरमधे पेस्ट करून घ्यावी, २ चमचे भरडलेले धणे., ४ लाल सुक्या मिरच्या, ३ टोमॅटो ची प्युरी, १ चमचा कसुरी मेथी, मीठ चवीनुसार.

कृती – सर्वप्रथम बटाटयाची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा. सिमला मिरचीच्या बिया काढुन मोठे तुकडे करावे. गरम तुपात बटाटे तळून घ्या.नंतर मिरच्या तळुन घ्याव्या. आता उरलेल्या तुपात भरडलेले धणे,लाल मिरच्यांचे तुकडे परतुन घ्यावे. लगेच च आले-लसुण पेस्ट्, टोंमॅटो-प्युरी घालुन तुप सुटे पर्यंत परतावे. आता कांदा-काजू पेस्ट परतावी. तळलेला बटाटा व मिरची घालावी. चवीप्रमाणे मीठ, कसूरी मेथी घालुन घालुन पुन्हा एकदा छान परतावे. गरम पोळी/पराठया बरोबर वाढावी.