झटपट रवा डोसा

साहित्य – एक वाटी बारीक रवा, एक वाटी तांदळाची पिठी, एक वाटी मैदा, एक वाटी आंबट दही, तेल, मीठ.

कृती – डोसे करायच्या आधी सर्वप्रथम दोन तास एक वाटी बारीक रवा, एक वाटी तांदळाची पिठी, एक वाटी मैदा, एक वाटी आंबट दही हे सर्व मिश्रण सरसरीत भिजवून घ्या. मग त्यात दोन चमचे कडकडीत तेल व चवीला मिठ घाला. डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरडय़ाप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून व्यवस्थित भाजून घ्यावा. तयार ढोसा चटणीबरोबर खाण्यास द्यावा.