चटक मटक अडई डोसा

साहित्य : पाऊण कप तांदूळ, अर्धा कप उडीद डाळ, पाव कप चणाडाळ, पाव कप तूरडाळ, पाव कप मूगडाळ, पाव कप मसूर डाळ, 12 ते 15 मेथी दाणे, 4-5 सुक्या लाल मिरच्या, 1 इंच आले तुकडा, चवीपुरतं मीठ, डोसा बनवण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मेथीदाणे, लाल मिरच्या पुरेशा पाण्यात किमान 5-6 तास भिजत ठेवाव्यात. त्यातील पाणी काढून दुसर्‍या एका भांड्यात काढून ठेवावे. डाळ-तांदळाच्या मिश्रणात आलं आणि मीठ घालून बारीक वाटावे. वाटताना बाजूला काढलेले पाणी थोडे थोडे घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाला वरतो तेवढे दाट वाटावे. त्यानंतर नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक डाव पीठ घालावे. गोल पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू लालसर भाजली गेली की दुसरी बाजू पालटावी. तयार डोसा सांबार, चटणी आणि बटाट्याची भाजी यासोबत सर्व्ह करावा. या डोश्याचे पीठ आंबवावे लागत नाही. मिक्सरमध्ये बारीक केले की, लगेच डोसे काढता येतात.