भरली इडली

साहित्य : दोन ते अडीच कप इडली पीठ, इडलीच्या कप्प्यांना लावण्यासाठी थोडेसे तेल, (सारणासाठी) पाऊण कप ताजा खवलेला नारळ, दोन चमचे काजू तुकडे, दोन चमचे बेदाणे, दोन चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट, अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा चमचा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ.

कृती : सर्वप्रथम सारणासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. इडली स्टॅण्डला तेलाचा हात लावावा. इडलीच्या कुकरमध्ये तळाला २ ते अडीच इंच पाणी गरम करण्यास ठेवावे. इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यात नारळाचे सारण पेरा. वरून इडलीचे पीठ घालावे. या इडल्या १५ मिनिटे वाफवाव्यात. ५ मिनिटांनी कुकर उघडून इडल्या काढाव्यात. गरमागरम सव्र्ह कराव्यात.