चिकन पॉपकॉर्न


सामना ऑनलाईन

केएफसीमधले चिकन पॉपकॉर्न अनेकांना आवडतात पण हे पॉपकॉर्न करणं म्हणजे अगदी काही मिनीटांचेच काम आहे. घरात सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरुन आपण चिकन पॉपकॉर्न बनवू शकतो. घरात पार्टी किंवा काही कार्यक्रम असल्यास हे पॉपकॉर्न स्टार्टर म्हणूनही बनवता येतात. अगदी सोप्पी व चविष्ट अशी ही डिश आहे

साहित्य: बोनलेस चिकन (बारिक तुकडे), शेजवान सॉस, ब्रेड क्रम्स किंवा कुस्करलेले कॅलॉग्स, तळायला तेल, मैदा,  कॉर्न फ्लॉवर , मीठ

कृती -चिकनला मीठ व शेजवान सॉस लावून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवावे. एका भांडय़ात मैदा-कॉर्नफ्लॉवर सम प्रमाणात घ्यावे व त्यात पाणी, किंचीत मिठ टाकून भजीच्या पीठासारखी पेस्ट तयार करावी. कढईत तेल गरम करावे. ब्रेड क्रम्स किंवा कॅलॉग्जचा चुरा एका प्लेटमध्ये घ्यावा. चिकनचे तुकडे पीठात बुडवून नंतर ब्रेड क्रम्स किंवा कॅलॉग्जचा चुऱयात घोळवावे व तेलात सोडावे. मध्यम आचेवर चांगले तळून घ्यावे. कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न तयार आहेत.