कैरी भात

1

साहित्य : १ चमचा किसलेले आले, १ चमचा हळद पावडर, हिंग चिमूटभर, मोहरी चिमूटभर, थोडेसे जिरे, मीठ चवीपुरते, ३ मोठ्या लाल मिरच्या, तेल ४ चमचे, चणाडाळ १ चमचा, ६ कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरलेली, ५० ग्रॅम काजू, उडीद डाळ १ चमचा, कैरीचा गर १ कप, ताजा भात ४ कप, कडिपत्त्याची दोन तीन पाने.

कृती : कैरी भात करताना सर्वप्रतम एका कढईत तेल तापवा. त्यात अख्ख्या लाल मिरच्या, मोहरी आणि जिरे घालून ते तडतडू द्या. त्यानंतर त्यात चणाडाळ, उडीद डाळ आणि कापलेले काजू घालून परतून घ्या. हे झाले की त्याच कढईत थोडे हिंग, कापलेल्या हिरव्या मिरच्या. कोथिंबीर, किसलेले आले, हळद पावडर आणि कैरीचा गर घाला. हे मिश्रण चांगले शिजले की मग त्यात ताजा फडफडीत भात घालून ते ढवळून घ्या. हा गरमागरम वाढला तर छान लागेल.