असे करा चटकदार काकडीचे धपाटे

साहित्य – अर्धा किलो कोवळी काकडी, दोन हिरवी मिरची, एक लहान चमचा ओवा, दोन लहान चमचे लाल तिखट, एक लहान चमचा हळद, जिरे दोन बारीक चिरलेले कांदे, दोन मोठे चमचे बेसन, एक मोठा चमचा ज्वारीचे पीठ, तेल, मीठ चवीनुसार

कृती – सर्वप्रथम काकडीला स्वच्छ धुऊन किसणीने एका भांडय़ात बारीक किसून घ्या. त्यात बेसन व ज्वारीचे पीठ घ्या. त्यात जिरे, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, कांदा, ओवा व मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. गॅसवर तवा ठेवून छोटय़ा चमच्याने थोडे तेल पसरवा. तेल गरम झाले की एका मोठय़ा चमच्याने थोडे मिश्रण तव्यावर टाकून गोल आकार द्या. थोडे तेल धोपटीच्या भोवताली सोडा. धपाटा थोडावेळ भाजू द्या आणि थोडे तेल धपाटय़ावर सोडा. मग उलट करून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्या. गरमा गरम काकडीचे धपाटे तयार. हे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करू शकता.