चटक मटक कोथिंबीरीचं धिरडं

22

 साहित्य :

एक वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, एक मोठा चमचा रवा, दोन वाटय़ा चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ताक, अर्धी वाटी पाणी, थोडं लाल तिखट, अर्धा चमचा जीरं, चवीनुसार मीठ.

कृती : धिरंड करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा गॅसवर तापत ठेवावा. वरील सर्व साहित्य एकजीव करुन घ्यावे. तवा तापला की नारळाच्या शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं. जेणेकरुन धिरडं चिकटणार नाही. एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरवून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं. धिरडं उलटावं, नीट उलटलं गेलं की गरमागरम खायला द्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या