कुरडईची भाजी

156

साहित्य : ४ कुरड्या किंवा त्यांचा चुरा, १ बारीक चिरलेला कांदा, ७-८ कढीपत्त्याची पाने, ७-८ लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी-जिरे, १ चमचा लाल तिखट, १ चमचा कांदा-लसूण मसाला

कृती : सर्वप्रथम कुरडईचा चुरा करायचा. साधारण शेवया खातो त्या पद्धतीने करायचा. तुकडे केलेल्या कुरडईच्या चुर्‍यात पाणी घालायचं. त्यावर झाकण ठेवून त्या वाफवून घ्यायच्या. नंतर गॅसवर पातेलं ठेवून दोन चमचे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी घालायची. व्यवस्थित तडतडली की, जिरं-हिंग घालायचं त्यानंतर लसूण घालायचं. मिनीटभर सगळं परतून घ्यायचं. त्यावर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर कुरडईमधलं पाणी काढून घेण्यासाठी त्यातील पाणी गाळणीने गाळून घ्यायचं. यावर कांदा-लसूण मसाला घालायचा. याऐवजी गोडा किंवा वर्‍हाडी मसालाही घालू शकता. सर्व मिश्रण मिनीटभर परतून घेऊन त्यावर गाळून घेतलेल्या कुरड्या घालायच्या. वरून चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊन त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर कुरडई भाजी चार-पाच मिनिटे व्यवस्थित वाफ येऊ द्यावी. झाकण काढून पुन्हा भाजी परतून घ्यावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवावी. सर्व्ह करावी.

आपली प्रतिक्रिया द्या