अननस थंडाई

साहित्य : अननसाचे चौकोनी तुकडे १ वाटी, अडीच कप अननसाचे सरबत, १०० ग्रॅम बदाम, ३ मोठे चमचे खसखस, ६ मोठे चमचे साखर, बर्फाचा चुरा

कृतीः सर्वप्रथम खसखस दहा ते बारा तास आधी भिजवून ठेवावी. बदामाची साले काढून घ्यावी. त्यानंतर ५० ग्रॅम बदाम व खसखस वाटून घ्यावी. उरलेल्या ५० ग्रॅम बदामाचे पातळ-जाड काप करून घ्यावे. नंतर वाटलेल्या मिश्रणात पाच ग्लास पाणी घालून ते गाळून घ्यावे. पाण्यात अननसाचे सरबत व साखर घालून हे मिक्सरमधून काढावे. त्यात अजून १ ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आणि आयत्या वेळी अननसाचे तुकडे व बर्फाचा चुरा घालून अननस थंडाई पिण्यास घ्यावी.