बटाट्याचं धिरडं

बटाट्याचं धिरडं

साहित्य- एक वाटी तांदळाचं पीठ, दोन मोठे चमचे बारीक रवा, एक वाटी पाणी, एक वाटी किसलेला बटाटा, एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, एक चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं, मीठ चवीनुसार.

कृती – धिरडं करण्यासाठी सर्वप्रथम बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा. सर्व साहित्य एकजीव करून घ्यावा. तवा तापला की नारळाच्या शेंडीने तव्याला तेल लावून घ्या. जेणेकरून धिरडी चिकटणार नाहीत. त्यानंतर एक चमचाभर पीठ घालून ते तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं. चर्र असा आवाज आला की धिरडं उलटावं. नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला. एकदम जमलं की तवाभर धिरडं करता येतं.