व्हेज रोल

साहित्य
३ कप मैदा, २ कप दूध, २ अंडी, चवीपुरते मीठ

आतील सारण
२-३ गाजरे, अर्धी वाटी मटारचे दाणे, ७-८ बटाटे, २ कांदे, मीठ, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, अर्धे लिंबू.

कृती
सर्वप्रथम बटाट्य़ाची साले काढून बारीक फोडी कराव्यात. गाजर व कांदाही बारीक चिरून घ्यावा. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात. त्यानंतर थोड्य़ाशा तुपावर कांदा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्यात. या भाज्या मऊसर शिजल्यावर सर्व पाणी आटवून घ्यावे. त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून भाजी थाळीत काढून ठेवावी. नंतर दुधात अंड्य़ातले पिवळे घालून फेटावे. नंतर त्यात मैदा घालून पीठ तयार करावे. मीठ घालावे. एक तासभर मिश्रण तसेच ठेवावे. आयत्या वेळी अंड्य़ातले पांढरे खूप फेटून त्यात घालावे आणि डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत. प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी 1 डावभर घालून जरा पसरून त्याची डोशाप्रमाणे घडी घालावी. दोन्ही कडेची टोके पुन्हा दुमडून चौकोनी घड्य़ा घालून डोसे सॉससोबत सर्व्ह करावेत.