चटक मटक

चिकन करी स्पेशल

साहित्य : 1 किलो चिकन, 4 मोठे चमचे तेल, 6 कढीपत्त्याची पाने, पाऊण चमचा कलौंजी, पाऊण चमचा मोहरी, 8 चिरलेले टोमॅटो, 1 चमचा धणे, 1 चमचा मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा लसूण, 1 मोठा चमचा भाजलेले तीळ, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता घालून तळून घ्यावे. नंतर कलौंजी आणि मोहरी भाजावे. त्यानंतर गॅस कमी करून चिरलेला टोमॅटो तेलात घालून 2 मिनिटे परतवून घ्यावा. नंतर मिरची, धणे, जिरे, लसूण बारीक वाटून घ्यावे. ते या तेलात घालावे. वरून चिकनचे स्वच्छ केलेले तुकडे घालावेत. अंदाजानुसार पाणी घालावे. चवीप्रमाणे मीट-मसाला घालावा. घट्ट रस्सा होईपर्यंत चिकन शिजवावे. तीळ आणि चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम गरम करी भाताबरोबर खाण्यासाठी वाढावी.