दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून

136

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा 17 ते 30 जुलै, बारावीची परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट तसेच बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 ते 31 जुलैदरम्यान होईल. प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांच्या परीक्षा 9 ते 16 जुलै या कालावधीत शाळा आणि
कॉलेजस्तरावर पार पडणार आहेत.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard. maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वेबसाइटवरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या