Recipe- मॉकटेल्सने करा मूड रिफ्रेश

165

सामना ऑनलाईन । मुंबई

उन्हाळा म्हटला की पन्हं, कोकम सरबत किंवा आवळा सरबत अशी पेयं तुमच्या नजरेसमोर येतात. मात्र या नेहमीच्या पेयांसोबत काही हेल्दी आणि चविष्ट मॉकटेल्सही बनवून पहा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. मग चला पाहू कशी करायची ही चविष्ट आणि हेल्दी मॉकटेल्स !!

१. पिनाकोलाडा

pina-colada
साहित्य – दोन कप अननसाचा रस, दोन कप नारळाचे दूध, थोडे तुकडे अननसाचे, दोन मोठे चमचे मध, बर्फाचा चुरा.
कृती – सर्व साहित्य एकत्र करून घुसळावे आणि उंच ग्लासमध्ये द्यावे. त्यात अननसाचे बारीक तुकडे वरून घालावेत.

२. ब्लू लगून

blue-lagoon
साहित्य – ब्लू कुरासो सरबत २ चमचे, सोडा, बर्फ
कृती – ग्लासात २ चमचे ब्लू कुरासो सरबत घ्यावे. त्यात सोडा ओतून नीट ढवळावे. वरून बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करावे.

३. मोहिटो

mojito

साहित्य – २ चमचे लिंबाचा रस, चवीपुरती साखर, पुदिन्याची ५ ते १० पाने, सोडा, बर्फ
कृती – लिंबाचा रस ग्लासात घेऊन त्यात साखर विरघळवून घ्यावी. त्यावर बर्फ टाकून सोडा ओतावा. ग्लास संपूर्णपणे न भरता वर थोडी जागा ठेवावी. मग त्या मोकळ्या जागेत पुदिन्याची पाने टाकून सर्व्ह करावं.

४. बे रूज

bay-rouge-mock
साहित्य – १/४ टीस्पून ब्लॅक करंट सिरप, २ टेबलस्पून क्रॅनबेरी ज्युस, सोडा, बर्फ
कृती – सोडा वगळता सर्व साहित्य शेकरमध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. मग ग्लासमध्ये तयार मिश्रण ओतून त्यावर सोडा घाला. ग्लासाला लिंबाची चकती लावून सर्व्ह करा.

५. ब्लडी मेरी

blood-mary
साहित्य – पाऊण कप टोमॅटो ज्यूस, १/४ चमचा रेडपेपर सॉस, दीड टीस्पून वूडचेस्टरशायर सॉस, लिंबू, मीठ, मीरपूड
कृती – हे सर्व साहित्य शेकरमध्ये एकत्र करून शेक करून घ्या. वरून बर्फ घालून सर्व्ह करा.

 

टीप- या सर्व मॉकटेल्ससाठी लागणारं साहित्य बाजारात उपलब्ध आहे. ज्यांना साखर नको असेल त्यांनी साखरेला पर्याय म्हणून मध किंवा मिंट कँडी वापरावी.

आपली प्रतिक्रिया द्या