‘इबलिस’चा हटके लोगो

सामना ऑनलाईन । मुंबई

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळय़ात ६ नामांकने आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या ‘बंदुक्या’ सिनेमाचे दिग्दर्शन करणारे राहुल चौधरी यांचा ‘इबलिस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘इबलिस’च्या लोगोचे फेसबुकच्या माध्यमातून नुकतेच अनावरण झाले. सिनेमाची एक झलक म्हणजे सिनेमाचा लोगो असतो. लोगोतून चित्रपटाची संकल्पना आणि गोषवाराच सांगितला जातो. ‘इबलिस’चा लोगो बघून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘धक्का लागी बुक्का’ अशी दमदार पंचलाइन असलेला हा सिनेमा आता ‘लवकरच होणार लढाई’ असे म्हणत याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.