रिलायन्स जिओ नव्या क्षेत्रात?

>>स्पायडरमॅन<<

मोबाईल इंटरनेट आणि मोबाईल उत्पादन क्षेत्रात जोरदार धमाके केल्यानंतर आता मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ लवकरच ब्रॉडबॅण्ड क्षेत्रात जोरदार पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. पुढील वर्षी रिलायन्स जिओ चक्क ३० देशांत आपली ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करण्याची शक्यता असल्याचेदेखील बोलले जात आहे. सध्या रिलायन्स जिओने पहिल्या टप्प्यात पाच करोड घरात ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्रॉडबॅण्ड सेवेबरोबरच रिलायन्स जिओ टीव्ही चॅनल्सचे प्रसारणदेखील करू शकते. महिना एक ते दीड हजार रुपयात ग्राहकांना एक गिगाबाइटचा स्पीड पुरवणारे इंटरनेट टीव्ही चॅनल्स आणि त्यासाठीचा सेटटॉप बॉक्स अशा सर्व सुविधा पुरविल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच मुकेश अंबानींनी या क्षेत्रात उतरण्याचे संकेत दिलेले होते.