जिओने समर सरप्राइज ऑफर मागे घेतली

1

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्रायच्या सूचनेनंतर रिलायन्स जिओने आपली समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याची घोषणा केली आहे. ज्या ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत जिओ प्राइम (९९ रुपये) आणि ३०३ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दराचा प्लॅन खरेदी केला आहे अशा ग्राहकांनाच समर सरप्राइज ऑफर मिळणार आहे. ज्यांनी ३१ मार्चनंतर समर सरप्राइज ऑफर घेतली होती त्यांना आता त्यांचा संबंधित दराचा प्लॅन लागू होईल. ज्या ग्राहाकांना समर सरप्राइज ऑफर मिळणार आहे अशांना जून अखेरपर्यंत विनामूल्य सेवा दिली जाईल आणि त्यांनी भरलेले प्लॅनचे पैसे जुलै २०१७च्या प्लॅनमध्ये वळते करुन घेतले जाणार आहेत. जिओने ग्राहकांसाठी विविध ‘टॅरिफ प्लॅन’ जाहीर केले आहेत. यातील कोणताही प्लॅन निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना आहे.

jio1