ठाणे, पालघरच्या किनारपट्टीवरील विकासकामांना मिळणार गती

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, ठाणे

पालघर व ठाणे जिह्याच्या समुद्र किनारपट्टीवरील विकासकामांना लवकरच गती मिळणार आहे. किनारपट्टीलगतच्या हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, रस्ते यांबरोबरच मच्छीमारांच्या घरांचीही दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. विशेषतः मच्छीमारांना याचा अधिक फायदा होणार असून शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे येथील कोस्टन झोन मॅनेजमेंट प्लॅनला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

सागरी किनाऱ्याजवळ असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई उपशहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांमध्ये कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनला परवानगी दिली होती. मात्र ठाणे व पालघर सागरी किनाऱ्यावरील  वसाहतींना याचा लाभ मिळत नव्हता. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिल्लीत केंद्रीय वनपर्यावरण आणि हवामान विभागाचे सहसचिव  रितेशकुमार सिंह, डॉ. एन. राजीवन यांची भेट घेतली. तसेच ठाणे, पालघर सागरी किनाऱ्यावरील भागाला कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली.

या पाठपुराव्याला यश आले असून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल सेंटर फॉर सायन्स स्टडीज या संस्थेने कोस्टल झोन मॅनेजमेंटला परवानगी दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला असून खासदार राजन विचारे यांनी केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या