गुजरात दंगल प्रकरण; मोदींविरोधात याचिका फेटाळली

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी मोदींना क्लीन चिट दिल्याच्या निर्णयाला आवाहन देणारी झाकिया जाफरी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरात दंगलीदरम्यान गुलबर्ग सोसायटीत घडलेल्या हत्याकांडात काँग्रेसचे माजी आमदार अहसान जाफरी यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी जाफरी यांची पत्नी झाकिया आणि गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ती तिस्ता सेटलवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व अन्य ५७ जणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष तपास समितीने मेदी यांच्यासह अन्य ५७ जणांना क्लीन चिट दिली होती. विशेष पथकाच्या या निर्णयाला जाफरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.