अर्धशिशीवर काही घरगुती उपाय

कधीतरी साधीसुधी डोकेदुखी ‘अर्धशिशी’सारख्या मोठ्या विकारात रूपांतरित होते. त्यावेळी काय करायचे?

लाईफस्टाईल थोडी बदलली तर अर्धशिशीपासून बचाव करता येऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या. दररोज जास्तीतजास्त पाणी प्या.ज्यांना हा विकार आहे त्यांनी डबाबंद पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. जंकफूड खाणे तर साफ बंद करायला हवे. त्यांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थच घ्यायचे.

अर्धशिशी विकारात अर्धेच डोके दुखते. पण तेही खूप त्रासदायक ठरते. पोटात गॅस, उलटी होणे, पोटात मळमळ होणे यामुळे हा विकार बळावतो. नेहमी शांत ठिकाणी राहणारा माणूस गोंगाट, गर्दीच्या ठिकाणी गेला की त्याची चिडचिड होते. त्यातूनच हा विकार होतो. अर्धशिशी होण्यामागे काहीजणांसाठी भावनात्मक कारणही महत्त्वाचे ठरते, तर काहीजणांना रक्तदाब, मधुमेह किंवा ताणतणावामुळे यामुळे हा रोग होतो. त्याबरोबरच शरीरात काहीवेळा विषाक्त पदार्थ नकळत गेल्यामुळेही हा विकार होऊ शकतो.

अर्धशिशीपासून वाचायचे तर रामबाण उपाय योगाभ्यास. मेडिटेशन केल्यामुळे मेंदू शांत होतो. त्यामुळे डोकेदुखी कमी होते. मात्र खूप उजेड असलेल्या ठिकाणी किंवा खूप तीक्र वास असलेल्या ठिकाणी मेडिटेशन करू नका.

या विकारावर घरगुती उपायही करता येतील. म्हणजेच देशी तुपात थोडे गूळ मिसळून त्यातील थोडे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी खायचे. तुळशीची पाने सुकवून त्याची पावडर करा. या पावडरीत थोडे मध घालून रोज थोडे थोडे खायचे. हिंग खाल्ल्यानेही अर्धशिशी बरी होऊ शकते.