संभाजीनगरात माँसाहेबांना अभिवादन

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

संभाजनगरात माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना गुलमंडी परिसरात तमाम शिवसैनिकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, सहसंपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, वैजयंती खैरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख जयवंत (बंडू) ओक, संतोष जेजुरकर, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, मनपा गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक मोहन मेघावाले, बन्सी जाधव, मनोज गांगवे, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, गिरजाराम हळनोर, सुभाष शेजवळ, विजय सुर्यवंशी सतीष कटकटे, ज्ञानेश्वर डांगे, अनिल जैस्वाल, ज्योती पिंजरकर, शिल्पाराणी वाडकर, सुमित्रा हळनोर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, सुनिता देव, शहर संघटक प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, तालुका संघटक जयश्री घाटगे, रेखा सुर्यवंशी, मीरा देशपांडे, दुर्गा भाटी, रेखा शहा, सुनिता सोनवणे आदींसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.