रेसूल पुकुट्टीने केली सईची स्तुती

मुंबई – मराठी चित्रपट, बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरचा लवकरच ‘लव्ह सोनिया’ हा इंडो अमेरिकन चित्रपट येणार आहे. या चित्रपटातील सईच्या अभिनयाची चक्क ऑस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर रेसूल पुकुट्टी यांनी स्तुती केली आहे. रेसूल यांनी सईसोबतचा एक फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘प्रचंड हुशार सई ताम्हणकर आज डबिंगला आली आहे. ती खूप हुशार असून तिच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतोय.’ असे त्यांनी फोटोखाली नमूद केले आहेत.

लव्ह सोनिया या चित्रपटाच्या डबिंगसाठी सई अंधेरी येथील पॉप्युलर स्टुडिओत रेसूल पुकुट्टीला भेटली. त्यावेळी रेसूल यांनी सईसोबत फोटो काढला होता.

लव्ह सोनिया हा चित्रपट ‘सेक्स ट्रॅफिकिंग’ या विषयावर आधारित आहे. या चित्रपटात सई मुख्य भूमिकेत असून अंजली नावाच्या मुलीची ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मनोज वाजपेयी, अनुपम खेर, रिचा चढ्ढा, अदिल हुसेन देखील आहेत.