ममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ममता बॅनर्जी यांनी माझ्यावर सूड उगविण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचा आरोप करत एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गौरव दत्त असे त्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून ते 1986 च्या बॅचचे अधिकारी होते.

गौरव दत्त यांनी स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. दत्त यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दत्त यांच्यावर काही वर्षापूर्वी भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ‘या प्रकरणात अद्याप पोलिसांकडे काही ठोस पुरावे नसल्याने पोलीस महासंचालकांनी ही केस बंद करण्याची शिफारस ममता बॅनर्जी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी केस बंद करण्यास नकारप दिला आहे. त्या सूडबुद्धीने हे सर्व करत आहेत. त्यांच्यापुढे झुकण्यापेक्षा मी मरण पसंत करतो.त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे गौरव दत्त यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहले होते.