ठाणेकर विद्यार्थी साहसी जलतरण मोहिमेवर

3

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाण्यातील १४ विद्यार्थी उद्या बुधवारी रेवस ते गेट वे ऑफ इंडिया ही २४ कि.मी. साहसी सागरी रिले जलतरण मोहीम पूर्ण करणार आहेत. सकाळी ६.३० वाजता हे ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी रेवसच्या समुद्रात उतरतील आणि सकाळी ११.३० वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे पोहोचतील.

सागरी जलतरण मोहिमेतील तीन विद्यार्थिनी व ११ विद्यार्थ्यांना मंगळवारी मारोतराव शिंदे जलतरण तलाव, ठाणे येथे मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अभिनेते मंगेश देसाई, ठाणे मनपा सभागृह नेते नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त संदीप माळवी, अनिल दगडे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.