जुन्या ठाण्याची ओळख

84

>> अरुण मालेगावकर

श्री स्थानक! ठाण्याचे प्राचीन नाव. सुमारे चौदाशे वर्षांच्या ठाण्याच्या इतिहासात अनेक बदल झाले. इ. स. 997 च्या ताम्रपटात ठाण्याचा उल्लेख श्रीस्थानक असून श्रीचा अर्थ गणेशाचे तीर्थस्थान असा आहे. इथे आशिया खंडातील पहिले रेल्वे स्टेशन आहे. 1853 मध्ये पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली. त्यावेळचा इतिहास मनोरंजक आहे. तो लेखकाने दिला असून सर्वात जुना रस्ता हा स्टेशनचा असून तो नगरपालिका वर्धापनदिन आणि स्वातंत्र्यदिन या दिवशी पाण्याने धुतला जात असे.

पूर्वी ठाण्यात टांगा होता. मासुंदा तलाव आणि इतर साठ तलाव इथे असल्याने तलावांचे शहर म्हणून ठाण्याची प्रसिद्धी होती. असंख्य मंदिरेसुद्धा होती. ही माहिती मिळविताना लेखकाने प्रचंड अभ्यास केल्याचे, संदर्भ ग्रंथ शोधल्याचे प्रकर्षाने जाणवते. ठाण्याचा परिसर निसर्गरम्य तर आहेच, शिवाय घोडबंदर रोड हा नवीन ठाण्याचा रस्ताही मोठमोठय़ा इमारतींनी सजलेला आहे. तसेच जुन्या आणि नव्या नामवंत संस्था सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम सतत करीत असतात. ठाणे पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही भाग कसकसे विकास पावले हे लेखकाने ओघवत्या शैलीत सांगितले असून पानोपानी छायाचित्रे दिली आहेत. एखाद्या गावाचे महानगर कसे होत जाते आणि

मुंबईच्या सावलीत राहूनही खुरटत नाही, हे सारेच विलक्षण वाचनीय आहे. पुस्तक संग्राहय़ आहे.

नावात दडलंय काय?
श्री. वा. नेर्लेकर
प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स
पृष्ठs ः 152, मूल्य ः 175 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या