स्वागत दिवाळी अंकाचे

दीपावली

दरवर्षीप्रमाणे या दिवाळी अंकात नामवंत साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य वाचकांचे विचारविश्व समृद्ध करण्यास उपयुक्त ठरेल. अंकाची सुरुवात हृषिकेश गुप्ते यांच्या ‘शेरलॉक होम्स’ आणि ‘कसब्यातला हस्तसामुद्रिक’ नावाच्या लघुकादंबरीने होते. मिलिंद बोकील, गणेश मतकरी यांसारख्या सुप्रसिद्ध लेखकांच्या कथा वाचनीय आहेत. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अरुण खोपकर यांनी लिहिलेला लेख गंधर्वांना भावनिक श्रद्धांजली वाहणारा आहे, असे नक्कीच म्हणता येईल. मणिपूरमधील हिंसाचारावर लिहिलेला ‘मणिपूर आणि मेंदू’ हा सुबोध जावडेकर यांचा लेख तेथील विदारक परिस्थितीवर वाच्यता करणारा आहे.

संपादक – अशोक केशव कोठावळे
पृष्ठ-256, मूल्य – 300 रु.

मराठी विज्ञान परिषद पत्रिका

मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे विविधतेने भरलेला आहे. संदीप भाजीभाकरे यांनी लिहिलेला ‘सायबर गुह्यांची उकल’ या लेखामध्ये सायबर गुह्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘जगावेगळय़ा जमाती’, ‘सिनेपॅमेऱयाची उत्क्रांती’, ‘मोहिनी मर्फीच्या नियमाची’, ‘हरित हायड्रोजन ः राष्ट्रहिताचे इंधन’सारखे वाचनीय लेख आहेत. संजीव कुलकर्णी, असीम चाफळकर, अंजोली पुरत यांच्या विज्ञानकथा वाचनीय आहेत.

कार्यकारी संपादक – शशिकांत धारणे
पृष्ठ – 152, मूल्य – 150 रु.

अंतरीचे प्रतिबिंब

‘अंतरीचे प्रतिबिंब’ हा दिवाळी अंक विविधतेने सजलेला आहे. कुमार केतकर यांचा ‘विलास विरुद्ध विकास’ हा वाचनीय लेख आहे. त्यानंतर संजय आवटे, राजू परुळेकर, हेमंत देसाई, अतुल भातखळकर, गणेश मतकरी या लेखकांचे लेख ज्ञानात भर घालणारे आहेत, तर ‘ऑपरेशन एक्स’, ‘लेखक म्हणून माझा प्रवास’, ‘स्त्री’ लिखित मराठी साहित्याच्या वळणवाटा’ तसेच ‘फुले, शाहू, आंबेडकर आणि भारतीय संविधान’, ‘रुग्णांबरोबर डॉक्टरांचा बळी’ आदी लेख माहितीपर आहेत. त्यानंतर प्रशांत कुलकर्णी यांचे ‘एका मराठी व्यंगचित्रांच्या पुस्तकाची चित्तरकथा’ हा प्रवास वाचनीय आहे. कथा या विभागात निरंजन घाटे, मीनाक्षी पाटील, पह्टो, सावली, धुपं आदी कथा वाचनीय आहेत.

संपादक – प्रज्ञा जांभेकर
पृष्ठ – 254, मूल्य – 300 रु.