लोकसभेतील 10 सर्वात श्रीमंत खासदार, 600 कोटी ते थेट राजवाड्यांचे मालक

4491

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून एनडीएने दुसऱ्यांदा ऐतिहासिक बहुमत मिळवत विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांचा 30 मे रोजी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे. यातील काही खासदार तुलनेने अतिशय गरीब आहेत, तर काही अति श्रीमंत आहे. पाहूया श्रीमंत खासदारांमध्ये कोणाचा समावेश होतोय…

नकुल नाथ –
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांचे सुपुत्र आणि छिंदवाडा मतदारसंघातून खासदारपदावर निवडून गेलेले काँग्रेस नेते नकुलनाथ यांच्याकडे 618 कोटींची चल, तर 417 कोटींची अचल संपत्ती आहे.

वसंतकुमार एच –
तामिळनाडूच्या कन्याकुमारी मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस खासदार वसंतकुमार एच यांच्याकडे 210 कोटींची चल, तर 187 कोटींची अचल संपत्ती आहे.

डीके सुरेश –
कर्नाटकच्या बंगळुरू ग्रामीण भागातून लोकसभेवर गेलेले काँग्रेस खासदार डीके सुरेश यांच्याकडे 33 कोटींची चल, तर 305 कोटींची अचल संपत्ती आहे.

केआरआरके राजू –
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर पक्षाकडून नरसापूरम मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले खासदार केआरआरके राजू यांच्याकडे 198 कोटींची चल, तर 127 कोटींची अचल संपत्ती आहे.

जयदेव गल्ला –
आंध्र प्रदेशच्या गुंटूर मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर निवडून आलेले जयदेव गल्ला यांच्याकडे 167 कोटींची चल, तर 137 कोटींची अचल संपत्ती आहे.

हेमा मालिनी –
उत्तर प्रदेशमधून मथुरा मतदारसंघातून भाजपकडून निवडून लढलेल्या आणि निवडून आलेल्या खासदार हेमा मालिनी यांच्याकडे 25.85 कोटींची चल, तर 224 कोटींची अचल संपत्ती आहे.

मलूक नगर –
उत्तर प्रदेशच्या बिजनौर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदा मलूक नगर यांच्याकडे 115 कोटींची चल, तर 134 कोटींची अचल संपत्ती आहे.

अडाला पी. रेड्डी –
आंध्र प्रेदशमधील नेल्लोर येथून लोकसभेवर गेलेले वायएसआरचे खासदार अडाला पी. रेड्डी यांच्या नावावर 95 कोटींची चल, तर 125 कोटींची अचल संपत्ती आहे.

सुखबीर सिंह बादल
पंजाबच्या फिरोजपूर येथून अकाली दलचे खासदार म्हणून निवडून आलेले सुखबीर सिंह बादल यांच्या नावावर 100 कोटींची चल, तर 117 कोटींची अचल संपत्ती आहे.

हरसिमरत कौर बादल –
पंजाबच्या बठिंडा येथील अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याकडे 100 कोटींची चल, तर 117 कोटींची अचल संपत्ती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या