जपानच्या ऑलीम्पिक पोस्टर गर्लला ब्लड कॅन्सर 

10


सामना प्रतिनिधी । टोकियो 

जपानी जलतरण क्वीन आणि 2020 च्या टोकियो ऑलीम्पिक क्रीडा स्पर्धेची ‘पोस्टर गर्ल’ रिकाको ईकी हिला रक्ताच्या कर्करोगाची (ल्युकेमिया) लागण झाल्याची दुःखद बातमी स्वतः रिकाकोने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून चाहत्यांना दिली आहे. गेल्या वर्षी 2018 च्या आशियाई स्पर्धेत जलतरणात 6 विक्रमी सुवर्णपदके पटकावण्याचा पराक्रम रिकोने  केला होता.

18 वर्षीय रिको म्हणते, ‘ऑस्ट्रेलियात अस्वस्थ वाटायला लागल्याने मी पुन्हा मायदेशी परतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत मला ब्लड कॅन्सर झाल्याचे उघड झाले. आता मी काहीशी अस्वस्थ असले तरी या भयानक रोगाशी लढा देऊन ऑलीम्पिकपर्यंत अधिक बलवान रिकाको म्हणून माझ्या चाहत्यांपुढे येईन. येते काही महिने मी कॅन्सरवरील उपचारासाठी खर्च करणार आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या