सैराट फेम रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा, मेकअप चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

13

सामना ऑनलाईन । मुंबई

सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा तिसरा सिनेमा येऊ घातला आहे. गणेश पंडित दिग्दर्शित मेकअप या चित्रपटात रिंकूची प्रमुख भुमिका आहे. त्याचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

टीजरमध्ये रिंकू दारू पिताना बडबडताना दिसत आहे. त्याचा ग्रामीण लहेजा या चित्रपटातही कायम आहे. एका ग्रामीण भागातून शहरात आलेल्या तरुणीचा रोल आहे का असा अंदाज या टीजर पाहिल्यानंतर व्यक्त करण्यात येत आहे. रिंकू काही तरी नवीन करत आहे असे इंटरनेट युजर्सने म्हटले असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या