संभाजीनगरात मुस्लिमांची दंगल, हिंदूंचे दंगलखोरांना चोख उत्तर

4

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

किरकोळ कारणावरून मुस्लिमांनी शुक्रवारी शहर पेटविले. मोतीकारंजा, गांधीनगर भागात मुस्लिमांच्या टोळक्यांनी दहशत निर्माण करत वाहनांची जाळपोळ केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शहागंजात जंगलखोर अंगावर येताच पोलिसांनी शेपूट घालून पळ काढला. मुस्लिमांच्या दंगेखोरीला उत्तर देण्यासाठी हिंदूंचा जमाव रस्त्यावर उतरला. यावेळी झालेल्या तुफान दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले, यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत ही दंगल धुमसत होती.

sambhajinagar-water-riot-2

शहरातील बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. मोतीकारंजा परिसरातील गांधीनगर भागातही ही मोहीम हाती घेण्यात आली . मुस्लिम वस्त्यांना पाणी न मिळाल्याने या भागामध्ये संतापाचे वातावरण होते. त्यातच पाईपलाईनवर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली आणि अवघ्या काही  मिनिटांमध्ये हाणामारीचे रुपांतर दंगलीमध्ये झाले. मोतीकारंजा आणि गांधीनगर भागातील तरुण लाठाकाठ्या आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले.

sambhajinagar-water-riot-st

या टोळक्याने बंद दुकानांवर लाथा मारीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाड्यांना दंगेखोरांनी लक्ष्य केले. पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आणि त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. दंगलखोरांच्या भीतीने पोलिसांनी शहागंजातून चक्क पळ काढला.  पोलीस पळून जात असल्याचं बघून दंगलखोरांना ऊत चढला आणि त्यांनी पुन्हा जाळपोळीला सुरूवात केली.

sambhajinagar-water-riot-3

मुस्लिमांनी दंगलीला सुरूवात केल्याचं कळताच त्यांना रोखण्यासाठी हिंदुंचा जमावही रस्त्यावर उतरला. हिंदुंनी दंगलखोरांना जबरदस्त प्रत्युत्तर देत हुसकावून लावले. दंगलीची माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख  प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी मोतीकारंजा भागात धाव घेत हिंदूंना दिलासा दिला. हिंदूंचा जमाव वाढत चालल्याचे पाहून मुस्लिम दंगलखोर सिटी चौकात आले. रात्री उशिरा राजाबाजार, नवाबपुरा भागात दंगलीचे लोण पसरले. शहागंजमध्ये अश्रुधुराच्या तीन फैरी झाडण्यात आल्या.

पाण्याच्या कारणावरून ही दंगल सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाहीये. हफ्त्याच्या वसुलीवरून हाणामाऱ्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुलीच्या छेडछाडीवरून ही दंगल झाल्याची अफवा पसरली. यामुळे रात्री शहरात संभ्रमाचे वातावरण होते.