ऋषभ पंतने शेअर केला ‘ती’चा फोटो, पण ती आहे तरी कोण?

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा तरुण यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत याने इन्स्टाग्रावर ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो शेअऱ केला. या फोटोतील मुलगी नक्की कोण आहे याचा आता शोध लागला आहे. पंतने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली, परंतु पंतप्रमाणेच तिने देखील तोच फोटो शेअऱ केल्याने हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे.

पंतने ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअऱ केला होता. ‘मी तुला आनंदी ठेऊ इच्छितो आणि मी इतका आनंदी आहे याचेही कारण तूच आहे’, असे कॅप्शन पंतने फोटोला दिले सोबत ह्रदयाच्या आकाराचा इमोजीही शेअर केला होता. फोटोतील मुलगी नक्की कोण याचा नेटकरी शोध घेत होते.


View this post on Instagram

I just want to make you happy because you are the reason I am so happy ❤️

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

पंतने शेअऱ केलेल्या फोटोतील मुलीचे नाव आहे ईशा नेगी. पंतप्रमाणेच ईशानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तोच फोटो शेअर करत सुंदर असे कॅप्शन दिले आहे. यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले.

isha-negi

हिंदुस्थानकडून पंतने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 2 शतक आणि 2 अर्धशतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पंतने पुजारानंतर सर्वाधिक धावा केल्या होत्या, तसेच यष्टीमागेही ऐतिहासिक कामगिरी केली. पंतने 10 टी-20 सामनेही खेळले असून यात 157 धावा ठोकल्या आहेत.