World cup 2019 पंतच्या तिकीटावर टांगती तलवार, ‘ही’ आहेत तीन कारणं

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी आगामी विश्वचषकामध्ये महेंद्र सिंह धोनीसह दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांचे स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. परंतु एक दिवसीय मालिकेमध्ये दणकून मार खाल्लेल्या टीम इंडियातील परिस्थिती बदलली आहे. येत्या एक महिन्यामध्ये विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता असून यष्टीरक्षक फलंदाज पंतच्या तिकीटावर टांगती तलवार आहे.

रिषभ पंतला पाच कोटींची लॉटरी

विश्वचषकासाठी कोणत्या 15 खेळाडूंची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषभ पंत, विजय शंकर, केएल राहुल आणि रविंद्र जाडेजामध्ये संघात स्थान मिळवण्याची चुरस आहे. परंतु पंतचा पत्ता कट होताना दिसत आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय मालिकेमध्ये पंतने फलंदाजी आणि यष्ट्यांमागेही साधारण कामगिरी केल्याने त्याच्या नावावर विचार होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे. यामागे काय आहे कारणं पाहुया…

यष्ट्यांमागे साधारण कामगिरी
धोनीला आराम देण्यात आल्यानंतर पंतच्या कामगिरीवर सर्वांची नजर होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन सामन्यात पंतची कामगिरी खराब झाली. पंतने कॅच तर सोडलेच शिवाय बाईजच्या रुपामध्ये धावा दिल्या. मोहालीतील सामन्यात टर्नरला बाद करण्याची सोपी संधी सोडल्याने हा सामना टीम इंडियाला गमवाला लागला. टर्नर त्यावेळी 38 धावांवर होता आणि त्याने अखेरपर्यंत नाबाद राहात 43 चेंडूत 84 धावा केल्या. या सामन्यात पंतने हॅण्डस्कॉम्बचा बाद करण्याची संधीही सोडली. यानंतर पंतला ट्रोल करण्यात आले होते.

pant

फलंदाजीतही थुकराट कामगिरी
यष्ट्यांमागे सुमार कामगिरी केलेल्या पंतने फलंदाजीतही थुकराट कामगिरी केली. धुवाधार फलंदाजी करून सामन्याचे रूप बदलण्याचा दमखम असणाऱ्या पंतने टी-20 मालिका आणि एक दिवसीय मालिकेतही निराशाजनक कामगिरी केली. दोन टी-20 सामन्यात पंतने फक्त चार धावा केल्या, तर शेवटच्या दोन एक दिवसीय सामन्यात 52 धावा केल्या. शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी असतानाही पंतने खराब फटका मारून विकेट गमावली. त्यामुळे त्याच्यावरील विश्वास कमी झाला आहे.

rishabh-pant

परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता नाही
दिल्ली सामन्यात पंतने चौथ्या स्थानावर फलंदाजी केली. यावेळी हिंदुस्थानने दोन विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी पंतकडे मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती. रोहितसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी पंतवर होती. यावेळी सिंगल, डबलवर भर देऊन डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती, परंतु पंतने खराब फटका मारून आपली विकेट गमावली. परिस्थितीनुसार खेळ करण्याची क्षमता त्याच्यामध्ये कमी दिसून आल्याने विश्वचषकामध्ये त्याच्या निवडीवर शक्यता कमी आहे.