शंकर महादेवन शोधणार रायझिंग स्टार

सामना ऑनलाईन । मुंबई

गायक शंकर महादेवन, दिलजित दोसांझ, मोनाली ठाकूर पुन्हा एकदा रायझिंग स्टार शोधायला सज्ज झाले आहेत. रायझिंग २ स्टार हा रिऍलिटी शो २० जानेवारीपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता सुरू होईल. गृहिणी असो, रिक्षा ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय त्यांच्यातील कला हेरून तिला जगासमोर आणण्याचे कार्य रायझिंग स्टार शोच्या माध्यमातून केले जाते.

याविषयी कलर्सच्या प्रोग्रॅमिक हेड मनीषा शर्मा म्हणाल्या, हिंदुस्थानातील टॅलेंट शोधून काढण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यांना चमकण्याची संधी आम्ही देणार आहोत. अन्य स्पर्धकांच्या प्रवेशपत्रिका आणून देणारी पोस्टवुमेन देखील आमची स्पर्धक आहे. या सीझनचे प्रेक्षक स्वागत करतील अशी आशा आहे.