रस्ते आणि नालेसफाई घोटाळा भोवला, उदय मुरुडकर यांना सक्तीची सेवानिवृत्ती

1

सामना ऑनलाईन, मुंबई

रस्ते आणि नालेसफाई घोटाळ्यात दोषी आढळलेले दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. मुरुडकर यांची तीन वर्षांची सेवा शिल्लक आहे, मात्र त्यांची सचोटी संदिग्ध आहे, तसेच त्यांची नैतिक अधोगती झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने हा निर्णय घेतला.

रस्तेदुरुस्ती घोटाळाप्रकरणी पालिका प्रशासनाने उदय मुरुडकर यांना १९ सप्टेंबर २०१५ मध्ये निलंबित केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यातच पर्जन्य जलवाहिन्या खात्यांतर्गत मोठय़ा नाल्यांच्या सफाईच्या कामातही अनियमितता आढळली. या प्रकरणाचाही मुरुडकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांत मुरुडकर हे दोषी आढळले असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे.