रस्ता डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले

सामना ऑनलाईन । मालवण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गोळवण रस्त्यावर सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शनिवारी (१४) काम रोखले. दरम्यान सायंकाळी सहायक अभियंता पी. डी. पाटील यांनी डांबरीकरण ठिकाणी येत दर्जेदार काम ठेकेदाराकडून करून घेतले जाईल. डांबराचाही अधिक वापर केला जाईल या आश्वासनंतर सायंकाळी काम सुरु करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेतुन गोळवण तिठा ते पोईप पालव मार्ग या दीड किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण काम सुरु होते. ते कुंभादेवी ग्रामस्थांनी दुपारी रोखले होते. यावेळी माजी सरपंच सुभाष लाड, विनायक चिरमुले, प्रकाश चिरमुले, कृष्ण चिरमुले, संतोष चिरमुले, बबन चिरमुले, विजय चिरमुले, धनाजी चिरमुले, जगन्नाथ चिरमुले, राजेंद्र तेजम, आप्पा घाडी, आनंद दुखंडे, विजय पालव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.