युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती रोड शो

सामना ऑनलाईन, मुंबई

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शनिवारी वांद्रे, वरळी, लोअर परळ, लालबाग, शिवडीत झंझावाती रोड शो झाला. हाती भगवे झेंडे घेऊन निघालेले हजारो बाईकस्वार, ठिकठिकाणी होणारी फटाक्यांची आतषबाजी आणि चौकाचौकावर होणाऱया ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी प्रत्येक विभागात भगवे वादळ निर्माण झाले. या भगव्या रॅलीत  शिवसेनेच्या उमेदवारांसह असंख्य तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी आमदार सुनील शिंदे, युवाधिकारी संदीप वरखडे, युवासेना कार्यकारिणी सदस्य बाळा कदम, शाखाधिकारी सुरज गुरव, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत व युवासैनिक आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित हेते.