मौजे हरंगुळ येथे घरफोडी, 2 लाख 22 हजारांचा ऐवज पळवला

14

सामना प्रतिनिधी । लातूर

तालुक्यातील मौजे हरंगुळ बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चोरी प्रकरणी प्रभू सिद्राम वाघमारे यांनी तक्रार दाखल केली आहे. 13 मे रोजी त्यांनी बँकेतून 1 लाख 50 हजार रुपये काढून आणले होते. विहिरीचे खोदकाम करण्यात येत असल्याने ही रक्कम काढलेली होती. सदर रक्कम ही घरातील लोखंडी पेटीत ठेवण्यात आलेली होती. 50 हजार रुपये विहिरीचे काम करणाऱ्या गुत्तेदारास दिले होते. दुधाचे आलेले बारा हजार रुपये पेटीत ठेवण्यात आले होते. 17 तारखेस सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गुत्तेदारास पैसे देण्यासाठी पेटी पाहिली असता पेटीचे कुलूप तुटलेले दिसले. पेटी उघडून पाहिली असता त्यामधील रोख 1 लाख 12 हजार रुपये, पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने ज्यामध्ये दिड तोळ्याचे मिनी गंठण, एक नेकलस दिड तोळयाचे, एक तोळयाचे कानातील झुमके तसेच फिर्यादीचा मोबाईल असा 2 लाख 22 हजारांचा ऐवज पळवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या