मुंबई-मंगळूर एक्सप्रेस मध्ये चोरी

18

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढत आहे. मुंबई -मंगळूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील चेन अज्ञात चोरट्याने लांबवली. त्याच गाडीने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले.

सिंधू काळे ठाणे ते कणकवली दरम्यान मुंबई -मंगलोर एक्स्प्रेसने एस -३ डब्यातून प्रवास करत होत्या. त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमंतीची सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली. याच गाडीत स्लीपर -५ मधून प्रवास करणाऱ्या अश्विनी पाडावे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केला. या दोन्ही चोऱ्या खेड – दिवाणखवटी दरम्यान घडल्या. चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या