दरोड्य़ातील वाटणीवरून भिडले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले

सामना प्रतिनिधी । मुंबई

झवेरी बाजारातील सोनारकाम सुरू असलेल्या एका कारखान्याची टीप त्यांना मिळाली. प्लॅन ठरला. दरोड्य़ात जे काही मिळेल ते समान वाटून घेण्याचेही ठरले. दरोडा यशस्वी झाला. सुमारे ३७ लाखांचे सोनेही हाती लागले. पण वाटणी करताना कमी जास्त आली आणि यावरून दरोडा टाकणाऱयांमध्ये जुंपली. क्राइम ब्रँच युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी याच संधीचा फायदा घेत अवघ्या काही तासांत या टोळीचा पर्दाफाश केला.

दरोड्य़ाप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रँच युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन जगदाळे, एपीआय संतोष कदम यांच्यासह युनिट दोनच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल साळवी, किरण ऊर्फ सोन्या तावडे आणि जयरूल ऊर्फ पिंटू शेख या तिघांना अटक केली.