दिल्ली विमानतळावरती रोबोट सेवा

5


सामना ऑनलाईन । मुंबई

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत आता आर्टिफिशल इंटेलिजन्स, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवरती चालणारी अनेक यंत्रे मानवाच्या खांद्याला खांदा लावून कामे करू लागली आहेत. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवरती चालणाऱ्या या यंत्रांची मागणी वाढतच जाणार आहे, हे तर निश्चितच आहे. आता दिल्लीच्या विमानतळावरती विस्तारा एयरलाइन्सतर्फे ‘राडा’ नावाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवरती काम करणारा रोबोट प्रवाशांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. ५ जुलैपासून राडा आपल्या कामाला सुरुवात करेल. त्यानंतर प्रवासी त्याला कसा प्रतिसाद देतात, अजून काय सूचना करतात यावरती त्याला पुढे कोणती कामे द्यायची ते ठरवले जाणार आहे.

हा रोबोट लहान मुले आणि वृद्धांबरोबर विविध खेळ खेळून त्यांचे मनोरंजन करतो, गाणी ऐकवतो आणि व्हिडीओदेखील दाखवतो. ३६० अंशांत याचे शरीर फिरू शकते. चार कॅमेरे लावलेल्या एका चारचाकी ट्रकवरती याला ठेवण्यात आले आहे. या बरोबरच हा राडा रोबोट बार्ंडग पासदेखील स्कॅन करून देणार आहे. हळूहळू विमानांचे वेळापत्रक. त्यांची वर्तमान स्थिती, हवामान या सगळ्याचे अपडेट्स तो प्रवाशांना देईल.

आपली प्रतिक्रिया द्या